केरळच्या 'मुबलक ऑक्सिजन साठ्या' चे गमक काय ? राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता ; परराज्यांनाही निर्यात
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
तिरुअनंतपूरम, (प्रबोधन न्यूज) - देशाची राजधानी दिल्लीपासून भारतात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा आहे. आता तर परदेशातून ऑक्सिजन आणावा लागत आहे. प्रत्येक राज्यात ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव घुसमटत असताना, केरळ असं एक राज्य आहे, जिथे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. केवळ ऑक्सिजन उपलब्ध आहे असं नाही तर केरळ परराज्यांना ऑक्सिजन निर्यातही करत आहे.
आताच्या परिस्थितीत जर केरळमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवलाच, तरी या राज्याला दुसऱ्या कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. स्वत:चं उत्पनादन स्वत: करुन आपल्या नागरिकांचे जीव वाचवण्याची क्षमता केरळमध्ये आहे.
अन्य राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा
ताज्या आकड्यांनुसार, केरळ सध्या नियमितपणे दररोज 70 मेट्रिक टन ऑक्सिजन तामिळनाडूला आणि 16 मेट्रिक टन ऑक्सिजन कर्नाटकला निर्यात करत आहे. त्यावरुन केरळच्या ऑक्सिजन निर्मितीची क्षमता लक्षात येऊ शकते. मेडिकल ऑक्सिजन मॉनिटरिंगचे नोडल ऑफिसर आर वेणुगोपाल यांनी केरळमधील ऑक्सिजनबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, कोरोना संकटात आम्हाला दररोज 35 मेट्रिक टन ऑक्सिजनची तर नॉन कोव्हिड केयरसाठी दररोज 45 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असते. आमची क्षमता 199 मेट्रिक टन प्रति दिवस इतकी आहे. जर आवश्यकता भासली तर आम्ही उत्पादन क्षमता वाढवू शकतो.
केरळमध्ये ऑक्सिजनची कमी न होण्याचं एक मोठं कारण म्हणजे, इथे कोरोना रुग्णांची संख्या तर आहे, मात्र ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांची संख्या कमी आहे. केरळ कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ मोहम्मद अशील म्हणाले की, आम्ही कोरोना रुग्ण पहिल्या टप्प्यातच ओळखण्यात यशस्वी ठरत आहोत. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करणे शक्य होतं. त्यामुळे आमच्या इथे प्रत्येक रुग्णांला ऑक्सिजन लावण्याची गरज नाही. तसेच आशा स्वयंसेविका आणि पंचायतींमध्ये निवडून आलेले सदस्य हे केरळमधील सार्वजनिक आरोग्य प्रणालीचा कणा आहेत, हेदेखील ते आवर्जून नमूद करतात.
ऑक्सिजनची मागणी वाढली
केरळमध्ये ऑक्सिजन मुबलक आहे, मात्र मेडिकल ऑक्सिजनची मागणी गेल्या आठवड्यात वाढल्याचं डॉ. अशील यांनी सांगितले. इतरवेळी 73 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आता 84 मेट्रिक टनवर पोहोचली आहे. जरी ही मागणी वाढली असली तरी काळजीचं कोणतंही कारण नाही. कारण सध्याचे ऑक्सिजन प्लांट 100 टक्के क्षमतेने काम करत नाहीत. जर मागणी वाढली तर उत्पादन क्षमता 100 टक्क्यांनी वाढविण्यात येऊ शकते.